Thursday 6 November 2014

गृहदाह

शरतचन्द्र चटोपाध्याय यांच्या ''गृहदाह'' कादंबरीवर आधारित ''गृहदाह'' याच नावाच्या हिंदी मालिकेचे प्रसारण सध्या दूरदर्शनवर होत आहे. दोन मित्रांची गोष्ट व प्रेमत्रिकोण अशा प्रकारची थीम या मालिकेची आहे. कदाचित सध्या ''गृहदाह''चे रिपीट टेलीकास्ट सुरु आहे पण कलाकार व गोष्ट चांगली असल्यामुळे दूरदर्शनवर सध्या सुरु असलेल्या चांगल्या मलिकांपैकी ''गृहदाह'' एक आहे. माझ्या आवडत्या अभिनेत्यांपैकी एक गिरीश ओक यांचीही महत्वाची भूमिका या मालिकेमध्ये आहे. 

Saturday 6 September 2014

हुनरबाज

सुरभि या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रसिद्ध झालेली सूत्र संचालकांची जोड़ी न्हणजे रेणुका शहाणे
आणि सिध्दार्थ काक. ह्या जोडीने  ''हुनरबाज़'' ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून टीवीवर पुनरागमन केले आहे. स्किल डेवलपमेंट या विषयावर आधारित या कार्यक्रमामधुन रोजगार व स्वयं रोजगाराबद्दल माहिती देण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सन्नी पांचोली व प्रिंसी सुधाकरन ही सूत्रसंचालकांची जोड़ी सुद्धा टीवीवर पदार्पण करीत आहे.