Thursday 6 November 2014

गृहदाह

शरतचन्द्र चटोपाध्याय यांच्या ''गृहदाह'' कादंबरीवर आधारित ''गृहदाह'' याच नावाच्या हिंदी मालिकेचे प्रसारण सध्या दूरदर्शनवर होत आहे. दोन मित्रांची गोष्ट व प्रेमत्रिकोण अशा प्रकारची थीम या मालिकेची आहे. कदाचित सध्या ''गृहदाह''चे रिपीट टेलीकास्ट सुरु आहे पण कलाकार व गोष्ट चांगली असल्यामुळे दूरदर्शनवर सध्या सुरु असलेल्या चांगल्या मलिकांपैकी ''गृहदाह'' एक आहे. माझ्या आवडत्या अभिनेत्यांपैकी एक गिरीश ओक यांचीही महत्वाची भूमिका या मालिकेमध्ये आहे.